पत्रकार ते सरन्यायाधीश, कसा होता एनवी रमन्ना यांचा सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास?
न्यायाधीश नाथुलापती वेंकट रमन्ना यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले एसए बोबडे यांचा कार्यकाल शनिवार संपुष्टात आला. त्यानंतर आज रमन्ना यांना रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.
कोण आहेत सरन्यायाधीश नाथुलापती वेंकट रमन्ना?
सरन्यायाधीश सुरुवातीला एक पत्रकार म्हणून एनाडु वृत्तपत्रात एक पत्रकार म्हणून कार्यरत होते. राजकारण आणि न्यायालय या दोन विषयावर त्यांनी पत्रकारिता केली. शेतकरी कुटुंबातून जन्म सरन्यायाधीश नाथुलापती वेंकट रमन्ना यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 ला आंध्रप्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम येथे शेतकरी कुटुंबात झाला. ते वयाची 65 वर्ष होईपर्यंत या पदावर राहतील. ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. 1983 पासून न्यायालयीन क्षेत्राला सुरुवात... 1983 सुरुवातीला त्यांनी वकिल म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वकीली केली. आंध्रप्रदेशच्या उच्च न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
2014 पासून ते सर्वोच्च न्यायालयात उपन्यायाधीश म्हणून रुजू झाले. प्रगतशील विचार आणि मानवी हक्कांबाबत सरन्यायाधीश अधिक सजक मानले जातात.