न्यायालयांनी निष्पक्ष काम करणं अपेक्षीत : मंत्री नवाब मलिक

Update: 2021-12-08 11:38 GMT

परमबीर सिंग यांच्या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आक्रमक झाले आहेत. देशातील लाखो लोक न्यायाच्या प्रतिक्षेत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखन करुन न्यायालयं तातडीने निर्णय देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी कुठं न्याय मागायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

परमबीर सिंग यांना सातत्याने सुप्रिम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे. शिवाय नुकत्याच दिलेल्या आदेशात नव्यानं चार्टशीट दाखल करण्यासही बंदी घातली आहे. त्यावर बोलताना मलिक म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं कोर्टाकडून होणार संरक्षण चुकीचं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेचं गार्हानी प्रलंबीत ठेवली जातात. मग ठराविक लोकांना विशेष न्याय कसा मिळतो? असं ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी ओबीसी शिवाय निवडणुका पार पडू नयेत अशी आमची भुमिका आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या पुढील सुनावणीत न्यायालयाकडे राज्य सरकार अशी बाजू मांडेल असं त्यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News