देश सेवा करून सेवा निवृत्त झालेले रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्या मधील दांडगुरी वाकळघर गावचे पाच जवान सैनिक यांचा आपल्या मायदेशीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी या सैनिकांची जंगी मिरवणूक काढत त्यांचं स्वागत केले. गावांतील नागरिकांनी या सैनिकांची गावातून मिरवणूक काढली. परशुराम कडू, भरत सावंत,सचिन सावंत ,आदेश ओमाले,मोहन सावंत, हे निवृत्त सैनिक आज आपल्या गावी सेवा बजावून घरी परतले.