जात धर्म विचारून पत्रकारांवर हल्ले होत आहेतः उमाकांत लखेरा

देशभरात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आज दिल्लीत डिजीपब न्यूज इंडिया फाउंडेशन आणि प्रेस क्लब ऑफ इंडिया यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Update: 2022-04-07 02:15 GMT

देशभरात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आज दिल्ली त डिजीपब न्यूज इंडिया फाउंडेशन आणि प्रेस क्लब ऑफ इंडिया यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी मॅक्समहाराष्ट्र ने प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमाकांत लखेरा यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल बोलणं, प्रेस क्लब ऑफ इंडियाचं काम आहे. दिल्ली मध्ये बुराडी येथे कम्युनल गॅदरींग झाली. तसेच गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेश मध्ये बलिया जिल्ह्यात नोकरी तसेच शैक्षणिक पेपर लीक झाले. या प्रकरणाची बातमी देणाऱ्या एका पत्रकाराला डांबुन ठेवण्यात आलं आणि 'ही माहिती कुठुन मिळाली' असा जाब विचारण्यात आला. पत्रकारांकडे सगळ्या प्रकारची माहिती असते. त्यांचे सोर्स असतात.

प्रेस काउन्सिल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाइडलाइन्सनुसार, तुम्ही पत्रकाराला विचारू शकत नाही की, तुमचा सोर्स कोण आहे? त्यामुळे एखाद्या पत्रकाराला खरं बोलण्यापासून किंवा बातमी लिहिल्यापासुन रोखलं जातंय. यूपीमध्ये तर पेपर लीक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्याऐवजी प्रश्न विचारणार्‍या खरं बोलणाऱ्यांना जेलमध्ये घातलं जातंय.

त्यामुळे आम्ही यूपी सरकारकडे मागणी केली आहे की, जेलमध्ये बंद असलेल्या सर्व पत्रकारांना सोडलं जावं. काही ठिकाणी पत्रकारांना त्यांची जात, धर्म, नाव विचारून त्यांच्यावर हल्ले केले गेले. त्यामुळे भारत सरकारने याकडे लक्ष द्यावं, आणि आरोपींवर कारवाई केली जावी तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला पत्रकारांच्या फ्रीडम ऑफ स्पीच वर कोणतीच गदा येणार नाही.याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी उमाकांत लखेरा यांनी केली आहे.

Tags:    

Similar News