जे जे हॉस्पिटलमध्ये MARD च्या दादागिरीला प्रशासनाचा पाठिंबा
वैद्यकीय शिक्षणातील अंतिम वर्षाचे निकाल लागले असताना मार्ड (MARD) संघटनेच्या दबावापोटी मुंबईतील जेजे हॉस्पिटल प्रशासनाने विद्यार्थ्यांना होस्टेल खाली करण्याचे तुगलकी आदेश जारी केले आहेत.
जेजे हॉस्पिटल मधील MARD मधील पदाधिकारी यांनी आपला मनमानी कारभार सूरू केला आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
दिनांक २१ जुलै २०२३ रोजी अंतिम वर्षांमध्ये मधे असलेल्या निवासी डॉक्टर( resident doctor )चा निकाल लागला. आता सध्या तरी सर्व डॉक्टर आपल्या घरी गेली आहेत या मधे बहुतांश डॉक्टर हे परराज्यातील आहेत. (महाराष्ट्र बाहेरील असून) या नोटीस मुळे त्यांनां इथे येऊन रूम खाली करायची वेळ या MARD संघटनेने आणली आहे.
या नोटीस द्वारे विद्यार्थ्यांकडून दंडापोटी पैशाची मागणी केली असून या मधे महाविद्यालय प्रशासन याचा हात असल्याचा दिसते. जर निवासी डॉक्टर कडून कडून अशी पैसे ची मागणी केली याचं अर्थ गरज सरो वैद्य मरो अशी वृत्ती असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
2020 चा फरक अजून देण्यात आलेला नाही, त्याबद्दल ठोस पावले उचलण्यापेक्षा प्रशासन हॉस्टेल रिकामा करण्यात मग्न आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
१. सर्वप्रथम ही नोटीस मागे घेण्यात यावी आणि MARD अरे देवी अधिकाऱ्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई व्हावी( समज देण्यात यावा)
२. महाविद्यालय प्रशासनाचा याच्यामध्ये हात असल्यास तसं त्यांनी अधिकृत OFFICIAL नोटीस काढून नमूद करावे.
३. हा जमा केला जाणारा ५०० रुपये नेमकी कोणाच्या खिशात जाणार प्रशासन की MARD?
४. NOC साठी MARD कडून होणारी धमकी वजा नोटीस त्वरित काढण्यात यावी.
५. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स त्वरित अदा करण्यात यावे, मग सगळे रूम सोडतील हे आश्वासन सर्व डॉक्टर देत आहे.
६. डॉक्युमेंट CLEARANCE साठी लागणारा वेळ बघता 31 ऑगस्ट पर्यंत नोटीस प्रशासनाने द्यावी.( MARD ही OFFICAL BODY नसल्या कारणाने)