"आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद.." NCERT च्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांचं खोचक ट्वीट

संभाजी भिडे यांनी आंबा खाऊन मुलं होतात असं वक्तव्य केलं होतं. त्याचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी NCERT वर निशाणा साधला.;

Update: 2023-04-28 06:30 GMT

गेल्या काही दिवसांपासून NCERT ने बदललेल्या अभ्यासक्रमावरून देशात चर्चा सुरु आहे. अभ्यासक्रमातून महात्मा गांधी यांना वगळण्यात आल्याने टीका केली जात होती. त्यापाठोपाठ आता NCERT ने अभ्यासक्रमातून थेट डार्विनचा उत्क्रांतीचा सिध्दांतच वगळून टाकला आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी भिडे गुरुजींना केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत NCERT वर निशाणा साधला.

NCERT च्या 9 च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या पुस्तकातून चार्लस डार्विनचा उत्क्रांतीचा सिध्दांतच काढून टाकण्यात आला आहे. त्यावरून देशाच वाद सुरु झाला आहे. त्यातच याआधीही डार्विनच्या सिध्दांताला अनेक समाज कंटकांकडून विरोध होत होता. तर ईश्वराच्या कृतीतून सृष्टी निर्माण झाल्याचा दावा करताना माणूस माकडापासून हळुहळू उत्क्रांत होत गेला. हा सिध्दांतच अनेकांना मान्य नाही. त्यापार्श्वभूमीवर विज्ञानवादी विचार सोडून NCERT ने डार्विनचा उत्क्रांतीचा सिध्दांतच 9 वीच्या पुस्तकातून वगळण्यात आला आहे. त्याबाबत देशभरातील 1 हजार 800 शिक्षक, वैज्ञानिक, प्राध्यापक आणि विज्ञानप्रेमींनी आपल्या सह्यांसह NCERT चा निषेध केला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही, असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झाले ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद हा आता संपल्यात जमा. याचा अर्थ आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला, हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील.

ह्या बदल आम्हाला मान्य नाही, असे पत्रक देश भरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. विरोध केला जातोय हे कौतूकास्पद आहे.

Tags:    

Similar News