जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यात स्वीकारणाऱ्या खाडेकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड

1 कोटीची रोकड: सोन्याची बिस्किटे : 5.5 किलो चांदी: बारामती इंदापुरात फ्लॅट आणि प्लॉट...

Update: 2024-05-17 10:37 GMT

बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात एका व्यापाऱ्यास आरोपी न करण्यासाठी 1 कोटीच्या लाचेची मागणी करणाऱ्या व 5 लाख रुपये खाजगी ईसमाद्वारेद स्वीकारणाऱ्या हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकत झडती घेतली. या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. हरिभाऊ खाडे हा सध्या फरार आहे.




 


बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व हवालदार जाधव यांनी 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती तीस लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार 5 लाखाचा पहिला हप्ता घेताना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली तर हरिभाऊ खाडे व जाधवर हे फरार आहेत. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार हरिभाऊ खाडे यांच्या बीड मधील चाणक्यपुरी भागातील घराची झडती घेतली असता रोख 1 कोटी 8 लाख रुपये, सोन्याची बिस्किट व दागिने 72 लाख रुपयांचे तसेच चार लाख 62 रुपयांची 5.5 किलो चांदी याबरोबरच बारामती येथे फ्लॅट इंदापूर येथे फ्लॅट, इंदापूर येथे व्यापारी गाळा तसेच बारामती व परळी येथे प्लॉट अशी स्थावर मालमत्ता देखील आढळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आता पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या सह सहकारी करत आहेत.

Tags:    

Similar News