सध्या देशात अनेक शहराची नावं बदलली जात असताना आता फळाची नाव देखील बदलली जात आहेत. महाराष्ट्रात देखील काही शहरांची नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक शहरांची नावं बदलली. त्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ड्रॅगन फ्रूट चं नाव कमलम (कमळ) असं केलं आहे.
प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी ट्विटर वरून हे नाव बदलण्यात आल्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलंय जावेद अख्तर यांनी?
'गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव कमलम असे असायल हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील. खरंच हे सर्व मजेदार आहे'
असं म्हणत सरकारला टोला लगावला आहे.