प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तालिबान (Taliban) ने अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर तालिबानवर सडकून टीका केली आहे. NDTV या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बजरंग दल आणि आरएसएस वर देखील निशाणा साधला ते म्हणाले
"जगभरतील उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे, त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिदू राष्ट्र हवं आहे. हे सर्व एकाच विचारसणीचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो."
असं म्हणत आरएसएस आणि बजरंग दलावर निशाणा साधला आहे.
देशातील मुस्लिमांना तालिबानला पाठिंबा देत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, "मला त्यांचे वक्तव्य शब्दशः आठवत नाही, परंतु एकूणच त्यांची भावना अशी होती की, ते तालिबानचे अफगाणिस्तानमध्ये स्वागत करतात." अशा प्रकारे समर्थन करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.
मी ज्या अनेक मुस्लीमांशी बोललो त्यांना समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले.. भारतातील तरुण मुस्लिमांनाना चांगला रोजगार,चांगले शिक्षण आणि त्यांच्या मुलांसाठी चांगली शाळा हव्या आहेत. पण दुसरीकडे असे काही लोक आहेत. जे या प्रकारच्या संकुचित विचारसरणीवर विश्वास ठेवतात. जिथे महिला आणि पुरुषांना वेगळी वागणूक दिली जाते आणि मागास विचारसरणीला पाठींबा देत आहे.
तालिबान रानटी आणि RSS, विश्व हिंदू परिषद...
तालिबान रानटी आहेत आणि त्यांची कृती निंदनीय आहे यात शंका नाही. मात्र, आरएसएस, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाचे समर्थन करतात ते देखील समान आहेत.
असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.