आयोध्या येथे उभारलेल्या राम मंदिरामध्ये उद्याच्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून यानिमीत्त राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना देखील सरकारकडून जारी करण्यात आली आहे. भाजपचे नेते आमदार अतूल भातखळकर यांनी सर्वप्रथम मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे ही विनंती केली होती.
त्यानंतर मंञी लोढा यांनीदेखील हीच मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज सुट्टी जाहीर केल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुट्टी जाहीर केल्यामूळे आमदार भातखळकर यांनी शिंदे यांचे आभार मानले तसेच यादिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करुन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.