जळगावकरांची तहान लवकरच भागणार...
चोपडा शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जमिनीखाली टाकण्यात आलेल्या पाईपची जोडणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जळगावकरांची तहान लवकरच भागणार असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या अगोदर या पाईपलाईनचे काम पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चोपडा शहरातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.;
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत चोपडा शहरात टाकण्यात आलेल्या नवीन पाईप लाईनची जमिनीखालील जोडणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. साधारण दहा-बारा दिवस या जोडणीला लागणार आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धी केंद्राचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे. पाणी फिल्टर होऊन सर्व नव्या व जुन्या टाक्या भरणे सुरू आहे. तीन नविन टाक्यांची जोडणी पूर्ण झालेली आहे.
शहरातील नव्या व जुन्या पाईपचे इंटर कनेक्शन जोडणीचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी दहा-पंधरा दिवस अजून लागतील. त्यानंतर पूर्णपणे पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. या नवीन पाईप लाईनमधून कोणालाही नवीन कनेक्शन देण्यात आलेले नाही. जोपर्यंत कनेक्शनचे संपूर्ण काम होत नाही, तोपर्यंत नवीन पाईप लाईनचा फायदा नागरिकांना मिळू शकणार नाही. जो फायदा नागरिकांना मिळाला पाहिजे तो संध्या जनतेला मिळू शकणार नाही, जो पर्यत पाईपलाईन जोडणीचे संपूर्ण काम होत नाही, तोपर्यत पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य नसल्याचे पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतलेले तेजस कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक शिंदे यांनी सांगितले आहे.