राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वत्र गुलालाची उधळण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी समोर आली असून जिल्ह्यात एकूण 173 ग्रामपंचायतीत निवडणूक लढवण्यात आली होती. सर्वाधिक शिंदे गट भाजपचे सदस्य निवडून आले आहेत तर काँग्रेसच्या ग्रामपंचायतींची संख्या कमी आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा लागला असून जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीला चांगलाच धोबी पछाड दिला आहे.
शिंदे गटाकडे 35, भाजपकडे 35 तर अजित पवार गटाला 5 आणि उद्धव ठाकरे गटाला 5 जाग्यांवर विजय मिळवतां आला आहे तर काँग्रेस 2, शरद पवार गटाला 7 ग्रामपंचायत मध्ये यश मिळाले आहे. 10 ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सदस्यांची निवड झाली आहे.