मेंढपाळांचा संताप, आत्मसंरक्षणासाठी बंदूक द्या, प्रशासनाकडे मागणी

मेंढपाळांचा संताप, आत्मसंरक्षणासाठी बंदूक द्या, प्रशासनाकडे मागणी, काय आहे संपुर्ण प्रकरण वाचा...

Update: 2021-08-06 15:58 GMT

नांदेड मधील बिलोली तहसील कार्यालयावर जय मल्हार सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात अनेक मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढ्या घेऊन उपस्थित राहिले होते.

नांदेड: भटक्याचं जगणं असणाऱ्या मेंढपाळांवर आता हल्ल्यांची संख्या वाढली आहे. बिलोली तालुक्यातील मेंढपाळांवर सतत हल्ले होत आहेत.. चराई क्षेत्रामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करणे. वनविभागाकडून देखील आता या मेंढपाळांची पिळवणूक होत असल्याचा आरोप मेंडपाळांनी केला आहे.

मेंढपाळांवर वारंवार होणाऱ्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेंढपाळांवरील हे हल्ले रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. अशी मागणी मेंढपाळा सातत्याने करत आहेत. मात्र, त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मेंढपाळांनी बिलोली तहसील वर जय मल्हार सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

काय आहेत मेंढपाळांच्या मागण्या?

बिलोली तालुक्यातील मेंढपाळांवर होणारे अत्याचार त्वरीत थांबवावेत.

गावगुंड, दरोडेखोरांपासून आत्मसंरक्षणासाठी बंदूकीचा परवाना देणे.

विविध रोगांमुळे मेंढ्यांचा मृत्यू होतो त्यासाठी आर्थिक मदत जाहीर करणे.

वनक्षेत्र, गायरान जमीनींवरील अतिक्रमण तात्काळ हटवणे.

क प्रवर्ग क्षेत्रात मेंढया चरण्यासाठी मेंढपाळांना परवानगी द्यावी.

या प्रमुख मागण्या मेंढपाळ्यांनी केल्या आहेत.

या वेळी धनगर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी जय मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे, जिल्हाप्रमुख एकनाथ धमणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक मोर्चात उपस्थित होते.

Tags:    

Similar News