तरुणांच्या सर्जनशीलतेला कलागुणांना संधी देऊन त्यांना शिक्षित करून उद्योजगतेसाठी तयार करत रोजगाराच्या संधी निर्माण करणण्यासाठी 'जय भीम' शॉर्ट व्हिडिओ ॲप हे २६ जानेवारीला सर्वांच्या भेटीला येणार आहे. कंपनीचे सीईओ असलेल्या गिरीश वानखेडे यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये जय भीम शॉट व्हिडिओ ॲपचा फर्स्ट लूक टीजर दुबईमध्ये लॉन्च केला होता. गिरीश वानखेडे हे बॅालीवूड चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व असून ते चित्रपट व्यवसाय समीकक्षक आहेत व ओटीटी क्षेत्रातले तज्ञ आहेत. जय भीम ॲपचे उद्दिष्ट तरुणांच्या सर्जनशीलतेला कलागुणांना संधी देणे, त्यांना शिक्षित करून उद्योजगतेसाठी तयार करत रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आहे.
शॉर्ट व्हिडिओ बनवणाऱ्या कलाकारांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी, जगभरात संवाद साधण्यासाठी एक मंच देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावणे ही आज काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमुळे मनोरंजनातून समाजप्रबोधन तर होईलच पण त्यातून रोजगाराचे नवीन मार्ग मिळतील.
थोडक्यात या ॲपमध्ये मनोरंजन , उद्योजकता आणि शिक्षण ( इंटरटेंमेंट , इंटरप्रेनोरशिप , आणि इज्युकेशन ) ह्या तीन गोष्टींवर भर राहणार आहे . ज्याही लोकांचे स्वतःचे उद्योग आहेत त्यांना त्यांचे ब्रॅन्डींग प्रमोशन इथून करता येऊ शकेल . ई कॅामर्स प्लॅटफॉर्मच् फायदे इथे मिळू शकतील. ह्याच सोबत हे ॲप संविधान मुल्यांचा आदर्श ठेवून सामाजिक एकतेचे विचार मांडण्याचे माध्यम म्हणून काम करणार आहे.
देशविदेशातले लोक ह्या ॲपद्वारे एकत्र येणार असून सुसंवादाचे एक मोठे साधन हे ॲप बनणार आहे असेही ते म्हणाले. वानखेडे म्हणाले, खूप मोठ्या प्रमाणात लोकांना भेटून सर्वे फार्म गोळा करून जास्तीत जास्त ज्या नावाला लोकांना पसंती दिली त्यावरूनच ह्या ॲपचं नाव " जय भीम ॲप " ठेवण्यात आले आहे . ॲपचा टीजर रिलीज होताच, आम्हाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही ॲपचे लॉन्च नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये करण्याचे ठरवले होते. पण, ओमिक्रोन आणि कोविडच्या तिसरा लाटेच्या शक्यतेमुळे ते जमले नाही. मात्र, आता आम्ही प्रजासत्ताक दिनासारखा शुभ दिवस निवडून २६ जानेवारी संध्याकाळी ॲप लाँच करत आहोत. कोरोनामुळे हा कार्यक्रम सर्वांना ॲानलाईन / लाईव्हच बघायला मिळेल. जय भीम ॲप विनामूल्य अँड्रॉईड व आयओएसवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. हे ॲप छोट्या शहरातील, गावातील युवापिढीच्या कलागुणांनाही पंख देऊन त्यांना त्यांच्या करिअरला आकार देण्याची संधी मिळवून देणारं आहे. भारतीयांनी आपल्या भारताकरता, भारतीयांसाठी बनवलेले हे सर्वांगसुंदर आणि अस्सल भारतीय तितकेच दर्जेदार ॲप आहे असे त्यांनी सांगितले.