लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय!आमदार रोहीत पवार यांची बोचरी टिका ......

Update: 2023-01-21 06:56 GMT

 मुंबईत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामाचे काल लोकार्पण केले. यात मुंबईतील सात सांडपाणी प्रकल्प, मेट्रो दोन अ, मेट्रो ७ आणि २० ,आपला दवाखाना चे लोकार्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार रोहीत पवार यांनी ट्विट करत बोचरी टिका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत विविध विकास कामाचे काल लोकार्पण केले. यात मुंबईतील सात सांडपाणी प्रकल्प, मेट्रो दोन अ, मेट्रो ७ आणि २० ,आपला दवाखाना चे लोकार्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे समावेश आहे.या लोकार्पण सोहळ्यासाठी संपुर्ण मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी करण्यात आली होती होती .यातील बहुतेक प्रकल्प शिवसेनेच्या कार्यकाळात पुर्ण झाले आहेत . यामुळे श्रेयवादाची लढाई भाजप - शिवसेनेत सुरु झाली आहे.

ट्विट मध्ये काय म्हणाले रोहीत पवार.......

पहिल्या ट्विट मध्ये रोहीत पवार म्हणाले की, ;"काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल! या ट्विट च्या माध्यमातुन आमदार रोहीत पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर टिका केली आहे."

दुसऱ्या ट्विट मध्ये २०१६ साली शिवस्मारकाचे भुमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते . यांची आठवण करत आमदार रोहीत पवार यांनी ट्विट केले की ,"२०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!"

शिवस्मारकांचे पुढे काय झाले ????

२०१७ च्या मुंबई महानगरापालिकेच्या निवडुणका डोळ्यासमोर ठेऊन २०१६ साली शिवस्मारकाचे भुमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते .परंतु ७ वर्षे उलटुन देखील हे शिवस्मारकाचे काम अदयाप देखील पुर्ण झालेले नाही . स्मारक उभारणीच्या कामासाठी ३८२६ कोटी रुपयांची निविदा पहिल्या टप्पासाठी देण्यात आली होती , परंतु नंतर मात्र, स्मारकाच्या उंची व जागेवरुन वाद निर्माण झाला. त्यामुळे शिवस्मारकांचे काम आजुन देखील पुर्ण होऊ शकले नाही .

Tags:    

Similar News