महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सर्वत्र चालू असताना,या योजनेमध्ये पारलिंगी महिला म्हणून आमचाही समावेश होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत. आमच्याकडे पारलिंगी महिला ओळखपत्र असून देखील शासनाने या योजनेत आम्हाला समाविष्ट केलेले नाही. संविधानाने सर्वांना समान हक्क दिला असताना सरकारला आम्ही फक्त मतदानासाठी दिसतो का ? आम्हाला माणूस म्हणून जे हक्क संविधानाने दिले आहेत ते आम्हाला या सरकारला मिळू द्यायचे नाहीत का? असा सवाल पुण्यातील पारलिंगी महिलांनी उपस्थित केला आहे. पारलिंगी महिलांचे लाडकी बहिण योजणेबाबत काय म्हणणे आहे जाणून घ्या विजय रणदिवे यांच्या विशेष रिपोर्ट मधून फक्त मॅक्स महाराष्ट्रवर …