क्या गरीबोंकी जान जान नहीं होती सेठ? जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल

ठाण्यातील कल्याण, डोंबिवलीसह मुंब्रा आणि कळवा भागातील रेल्वे लाईन शेजारी राहणाऱ्या लोकांना सात दिवसांच्या आत घरे रिकामी करण्यास सांगितल्याने स्थानिक खासदारांसह मंत्री जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले. त्यांनी ट्वीट करत क्या गरीबोंकी जान जान नहीं होती सेठ असा सवाल रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.;

Update: 2022-01-23 08:06 GMT

ठाण्यातील कळवा, मुंब्रा, कल्याण आणि डोंबिवली भागातील रेल्वे स्टेशनच्या परिसरातील लोकांनी घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोणीही गरीबांचा निवारा हिरावून घेत असेल तर मी छातीचा कोट करून उभा राहिल असा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईनच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरीबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने यावर वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासीयांनी ठरवलं तर पुर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. लढाऊ असतो, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला इशारा दिला. तर क्या गरीबोंकि जान, जान नहीं होती सेठ, असे म्हणत केंद्र सरकारला सवाल केला आहे.

Tags:    

Similar News