राज ठाकरे यांना अटक होणार की नाही? कोर्टाचा महत्वपुर्ण निकाल

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांना इस्लामपुर सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याबाबत कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.

Update: 2022-06-17 16:08 GMT

रेल्वेमध्ये महाराष्ट्रातील स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी राज ठाकरे यांनी 2008 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनाचे संपुर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातही मनसे कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करत दुकानांची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी शिराळा सत्र न्यायालयाने राज ठाकरे आणि मनसे नेते तानाजी सावंत यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज ठाकरे हे वारंवार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अड़चणीत वाढ झाली होती.

राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटनंतर इस्लामपुर सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांना दिलासा दिला आहे. त्यामध्ये इस्लामपुर सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केला आहे. मात्र त्यासाठी राज ठाकरे यांना ऑनलाईन सुनावणीला हजर राहणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे या प्रकरणात सुनावणीला वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र राज ठाकरे यांच्या वकिल Adv. विजय खरात आणि आनंदा चव्हाण यांनी त्यांच्या गैरहजेरीत वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र शिराळा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार त्यांना सुरक्षा व्यवस्था असल्याने सुनावणीसाठी हजर राहिल्यास सरकारी यंत्रणेवर ताण येऊ शकतो, असा युक्तीवाद केला. तसेच राज ठाकरे यांच्यावर शस्रक्रीया करण्यात येणार असल्याचीही माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट रद्द करत दुरदृष्य प्रणालीद्वारे सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा राज ठाकरे यांना मोठा दिलासा मानला जात आहे.

Tags:    

Similar News