#ऑस्ट्रेलियात कोरोनाची तिसरी लाट आली का?
तब्बल तीन महिने कोरोना मुक्त असलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारला आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे. विक्टोरिया राज्यात पाच नवे कोरेना रुग्ण आढळल्याने संपूर्ण राज्यात आता लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती लागू करण्यात असा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.
काल मेलबर्नमध्ये जवळपास तीन महिन्यापेक्षा जास्त कोरोना मुक्त परिस्थिती अनुभवल्यानंतर पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यंत्रणा तातडीने कामाला लागली. तपास लोकांना ताबडतोब आयसोलेट करून टेस्टिंग आणि जीनोम मॅपिंग करण्यात आलं. केवळ पाच केसेस आधारावर संपूर्ण विक्टोरिया राज्य आणि मेलबर्न शहर पुन्हा लोकडाऊन मध्ये गेलेयं..
ऑस्ट्रेलियन आरोग्य अधिकार्यांच्या मतानुसार 'विश्वगुरु' भारताचा एक नागरिक भारतीय डबल म्युटंट घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचला आहे.
Brett Sutton @VictorianCHO describes the "double mutant variant" with "15 mutations" that they are trying to trace in Whittlesea and Greater Melbourne 😷😷😷 #COVID19Vic pic.twitter.com/ogwvjkVGng
— Wade Shipard (@wadeshipard) May 25, 2021
जाणकारांच्या मते ही ऑस्ट्रेलियामधील तिसरी कोरोना लाट असावी. केवळ पाच रुग्णांच्या आधारे संपूर्ण शहर आणि देशांमध्ये आवश्यक ती कडक कारवाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कित्ता शेजारच्या न्यूझीलंडने गिरवत पूर्ण यंत्रणा पुन्हा टाईट केली आहे.
विशेष म्हणजे तिथे कुठेही राजकीय आंदोलने झाली नाही. सर्व पाच कोरोना रुग्णांची लोकेशन आणि ट्रेसिंग तपासण्यात आली असून त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्वांना आयसोलेट करण्यात प्रशासनाने यश मिळवले आहे.