वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. रिपब्लिकन पक्षाच्या सुरवातीच्या काळात देशात आणि राज्यात या पक्षाचे आमदार,खासदार होते. पण सध्या आंबेडकरी राजकारण अपयशाच्या दिशेने झुकलेले आहे. आंबेडकरी पक्षाला पुन्हा राजकीय समृद्धी कशी मिळेल. राजकीय पक्षांच्या अपयशाची कारणे काय आहेत? आंबेडकरी नेत्यांचे काय चुकतंय का ? याबाबत आंबेडकरी विचारवंत,साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..