वाझे प्रकरण महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का?

Update: 2021-03-14 13:09 GMT

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दोन्ही टारगेट आता फळाला आले असून संजय राठोड यांच्या राजीनामे पाठोपाठ सचिन वाजे यांच्या मुसक्या NIA नी आवळल्यानंतर आता गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटची ही मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. सचिन वाजे प्रकरणाच्या आड हा 'ऑपरेशन लोटस' चा प्रयत्न तरी नाही ना? अशीही शंका वर्तवली जात आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वीपासून विरोधक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मंत्री संजय राठोड यांच्या मागावर होती. अपेक्षेप्रमाणे अधिवेशनाचे एक दिवस आधी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. उद्योगपती ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाचे प्रकरण विधीमंडळात चांगलेच गाजले. फडणवीसांच्या सनसनाटी आरोपांनी गृहमंत्री अनिल देशमुख बावरुन गेल्याचे दिसून आले. अखेर NIA सचिन वाझेला अटक केल्यानंतर महाविकास आघाडीचा पुरता फज्जा उडाला आहे.

वाझेंच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी काही पोलीस अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची तसेच या पोलिसांचे राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारचे बहुमत सध्या काठावरचे आहे. अशावेळी आपल्याला कोणीही शिरजोर ठरू नये याकरीता काहींच्या मागे चौकशीचा फेरा लावला जाऊ शकतो. या स्कॉर्पिओमागे जैश ए हिंद नावाच्या संघटनेचा हात असल्याचे तसेच त्याचे तिहार जेलशी कनेक्शन असल्याचे चित्र रंगवले जात होते. तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता, असेही आता स्पष्ट होत आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत हा तपास कोणता रंग घेतो हे पाहणे रंजक ठरेल, असे ज्येष्ठ गुन्हेविषयक पत्रकार किरण हेगडे यांनी म्हटले आहे.

राज्यात सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपकडून केली जाते. सचिन वाजे प्रकरणावरून पहिल्यांदाच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील अशा पद्धतीचे संकेत दिले होते. गेल्या दीड वर्षातील भाजपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न असफल झाल्यानंतर सचिन वाजे चा मुद्दा आयता घावल्यामुळे भाजप ही संधी सोडणारच नव्हता. त्यामुळे हा भाजपचा महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे असे पत्रकार प्रसाद नेरूरकर यांनी सांगितले.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बोलकी प्रतिक्रिया आली असून वाझेंशी माझी दुष्मनी नाही. ते काळे की गोरे हे देखील मी पाहिलं नाही. पण मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी जर अशाप्रकारे काम करत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेवर कसा विश्वास राहिलं? असा उलट प्रश्न उपस्थित केला आहे.

दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत वाझे यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न विचारुन त्यांची वकिली करण्याचं काम सरकारने केलं. पण NIA ने तपास हाती घेतल्यानंतर आता त्यांना यामध्ये महत्वाचे पुरावे मिळत आहेत. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणीही काही महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सचिन वाझेंपुरतं मर्यादीत नाही. त्यांना कोणी पाठींबा दिला, यामागे कोण आहे हे देखील आगामी काळात पुढे येईल. "उच्च न्यायालयाचा आदेश डावलून सरकारने वाझे यांना सेवेत घेतलं. याआधी ते शिवसेनेत होते म्हणून म्हणून प्रत्येक प्रकरण त्यांच्याकडे दिलं जायचं का? Crime Intelligence Unit सारख्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी वाझेंकडे कशी सोपवण्यात आली. त्यामुळे ज्या पोलीस अधिकाऱ्यावर संशय आहे तोच अधिकारी या प्रकरणाचा तपास कसा करु शकतो? भाजपवर आरोप करणाऱ्यांनी आरशात पहायला हवं. अशा घटनांमुळे मुंबई पोलिसांची चांगली इमेज तयार होते का?? या घटनेत विरोधीपक्षनेता म्हणून मी माझं काम केलं. त्यामुळे याची माहिती मला कशी मिळाली आणि ही माहिती मला विधानसभेत का मांडावी लागली याचं उत्तरही संजय राऊतांनी द्यावं", असं म्हणत फडणवीसांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वाझे हे सुरुवातीपासून वादग्रस्त अधिकारी असल्याचे PTI चे पत्रकार ज्ञानेश चव्हाण यांनी सांगितले. NIA च्या अटके पूर्वी ATS स्टेटस नाही अटक केली असेल तर महा विकास आघाडीची इभ्रत काही प्रमाणात वाचलीअसते असे त्यांनी सांगितले.

सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली होती. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं होतं. सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं. 17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं.

सचिन माझे प्रकरणावरुन बॅकफूटवर गेले महा विकास आघाडी सरकार आणि एका दमात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्यासह राष्ट्रपती राजवटीची मागणी म्हणजे ऑपरेशन लोटस ची सुरुवात असल्यास राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आगे आगे देखिये क्या होता है! असं सांगनं म्हणजे भविष्यात महा विकास आघाडी ला अधिक आव्हानांचा मुकाबला करावा लागेल असे दिसत आहे.

Tags:    

Similar News