जीवघेण्या कोविड संकटात मोदी सरकार आंतरराष्ट्रीय 'प्रपोगंडा' राबतेय का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताची परिस्थिती बिकट केली असताना भाजप समर्थक ट्रॉलर्स सिस्टीमला दोष देऊन 'पॉझिटिव्हिटी'चा आग्रह धरत आहे.;
यामध्ये आता कळस गाठत 'द ऑस्ट्रेलियन' या ऑस्ट्रेलियाच्या अग्रगण्य वर्तमानपत्रात कोरोना लाटेला जबाबदार मोदीविरोधी लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्ताने परदेशी वृत्तपत्राला नोटीस धाडली आहे.
भारतीय कोरोनाची परिस्थिती दाखवणारे ट्विटर अकाउंट बंदी पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राला नोटीस पाठवल्याने सोशल मीडियातून भाजप आणि भारतीय सरकार देशात परदेशात ' प्रपोगंडा' राबवून प्रतिमा मलीन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे.