भारताच्या परराष्ट्र धोरणाचा फज्जा उडतोय का?

भारताच्या कोविड व्यवस्थापन आवरून आंतरराष्ट्रीय माध्यमं टीका करत असताना माजी परराष्ट्र खात्याचे अधिकारी असलेले सध्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे दबाव आणून प्रपोगंडा राबवत आहेत. ऑस्ट्रेलिया मधील भारताचा दूतावास आणि न्यूझीलंडच्या आणि फिलिपाईन्सच्या भारतातील दूतावासाततील ऑक्सिजन प्रकरणावरून अभ्यासक आनंद शितोळे यांनी परराष्ट्र धोरणाचा फज्जा उडाला का ?असा प्रश्न परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे.

Update: 2021-05-04 03:23 GMT

श्रीमान एस.जयशंकर,
आपण परराष्ट्र मंत्रालयात उच्चपदस्थ म्हणून काम केलेले आहे. आपणास वेगवेगळ्या राष्ट्रांशी संबंध कसे ठेवावेत हे उत्तम ठाऊक आहे. आपला निवृत्त सहकारी कारमध्ये पार्किंग मध्ये पाच तास श्वास घ्यायला तडफडत होता त्यावेळी त्याला मदत मिळाली नाही मात्र त्याच्या निधनावर श्रद्धांजली वाहणारी ट्विट करायला तुम्हाला वेळ मिळाला ?

श्रीमान,

न्यूझीलंड, फिलिपाईन्स च्या दूतावासात ऑक्सिजन सिलिंडर हवे असताना त्यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत मागितली आणि त्यांनी दिली.मात्र नंतर तुम्ही किंवा अन्य कुणी दबाव आणून ट्विट काढायला लावलीत मात्र त्याच्या डिजिटल फुटप्रिंट उरल्यात त्याच काय

एमईएस म्हणजे मिनिस्ट्री फॉर एक्स्टर्नल अफेअर्स ना ? तेच आहे ना ट्विटर हँडल या मदतीला खोट ठरवणार ?

आता साक्षात न्यूझीलंड च्या प्रधान मंत्र्यांनी टीव्हीवर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत केल्याचं सांगितल्यावर तुम्ही कुणाची गंचाडी धरणार आहात ? न्यूझीलंड च्या टीव्ही चॅनल्स की थेट प्रधानमंत्र्यांची ? 



  Full View

की ते ट्विट वगैरे शी संबंध नाही म्हणून झटकून टाकणार ?

श्रीमान, मदत करता येत नसेल तर निदान असे खोडे घालून खोटेपणा करून देशाची उरलीसुरली अब्रू तरी निदान वेशीवर टांगू नका !!

#सीधी_बात

#मेंदूचा_कोरोना

Tags:    

Similar News