`भाजपा` बिल्डरांचे एजंट झाले का ?
भाजपा महाराष्ट्र द्वेष्टा असून महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे हे स्पष्ट आहे. पण आता बिल्डरांचे एजंट ही झाले का? गरोडीया बिल्डरचा सोमय्या व शेलार यांना इतका कळवळा का? कांजूरमार्गचीजागा राज्य सरकारची आहे तिथे कोणत्याही बिल्डरला भाजपाशी संबंधित असला तरी थारा देणार नाही असं कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.;
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचे कारशेड गोरेगावरुन कांजूरमार्गमधे हस्तांतरीत झाल्यानंतर केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला होता. आता गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील 500 एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या 100 एकर जमीनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे.मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने 16 एप्रिल 2016ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केलाय. यावर भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार यांनी इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या "सातबारा" आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना?
कांजुरमार्गच्या जागेचा निर्णय घेताय तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय? असा सवाल केला होता. त्याला उत्तर देत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर बिल्डरांचे एजंट असल्याचा आरोप केला आहे. भाजपा महाराष्ट्र द्वेष्टा असून महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे हे स्पष्ट आहे. पण आता बिल्डरांचे एजंट ही झाले का? गरोडीया बिल्डरचा सोमय्या व शेलार यांना इतका कळवळा का? कांजूरमार्गचीजागा राज्य सरकारची आहे तिथे कोणत्याही बिल्डरला भाजपाशी संबंधित असला तरी थारा देणार नाही असं सावंत यांनी म्हटलं आहे.