IRCTC ग्राहकांची माहिती विकून कमावणार 1 हजार कोटी?
IRCTC ग्राहकांची माहिती विकून 1 हजार कोटी कसे कमावणार? ग्राहकांच्या माहितीचे हजारो कोटी रुपये कसे मिळतात? विकलेल्या माहितीतून ग्राहकांच्या गोपनियतेचा भंग होत नाही का? काय आहे सर्व प्रकरण...;
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ने (IRCTC) आता आपल्या प्रवाशांचा डाटा विकून पैसे कमवण्याची योजना हाती घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, IRCTC डिजिटल कमाईतून 1 हजार कोटी रुपये कमावणार आहे.
IRCTC ची ही योजना समोर आल्यानंतर, 19 ऑगस्टला सकाळी शेअर मार्केटमध्ये त्यांच्या शेअरचा भाव वाढला होता. तर दुसरीकडे ग्राहकांच्या गोपनियतेचा प्रश्न देखील समोर आला आहे.
1 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता
विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग विभागाकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात माहिती असते. या माहितीच्या आधारे आयआरटीसी मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकते. मात्र, टेंडरमध्ये नमुद करण्यात आलेल्या नियमांनुसार, कंपनी वेबसाइटच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करु शकत नाही.
या योजनेसाठी आयआरसीटीसीच्या निविदा (टेंडर) जारी...
दरम्यान या संदर्भात जरी निविदा जारी झाल्या असल्या तरी ग्राहकांची माहिती अशा प्रकारे विकली जाणार असल्याने ग्राहकांच्या गोपनियतेचा आणि सुरक्षेसंदर्भात काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने IRCTC च्या या योजनेची माहिती शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयआरसीटीसी या सर्व योजनेसंदर्भात सल्लागार नेमणार असून हा सल्लागार त्यांना युजर्सची माहिती विकून कमाई कशी करायची? याबाबत सल्ला देणार आहे.
आयआरसीटीसी दिलेल्या टेंडरमध्ये नेमलेला सल्लागार कंपनीला युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आणि पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2018 या सारख्या नियमांचे सखोल विश्लेषण करेल. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती गोपनियतेच्या तत्त्वाचं उल्लंघन होणार नाही याची माहिती कंपनीला देणार आहे.
कंपनीकडे 100 टीबी डाटा (ग्राहकांची माहिती) आहे. कंपनी एकाच वेळेला हा सर्व डाटा विकणार नाही. कारण तो एकदाच विकला तर त्यापासून एकदाच कमाई होईल. त्यामुळं कंपनी हा डाटा वापरून वेळोवेळी पैसे कमविण्याची योजना आखत आहे.
इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन (IFF) आणि अनेक लोकांनी IRCTC च्या या नवीन योजनेबाबत चिंता व्यक्त केली असून ग्राहकांच्या गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
डाटा कसा विकला जातो आणि त्याचा फायदा कोणाला होतो?
ग्राहकांची माहिती विकत घेऊन त्या ग्राहकांना वस्तू विकल्या जातात. किंवा व्यापार केला जातो. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल. अशी वेळी तुमचा नंबर वेगवेगळ्या हॉटेलला दिला जाणार. तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्या ठिकाणचे हॉटेल तुमची माहिती त्यांना दिल्यामुळे ते तुम्हाला थेट फोन करणार. जेवनासाठी प्रवास करत असताना वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला जेवनाचे ऑर्डरसाठी मेसेज करु शकतात.
अशा प्रकारे अलिकडे सर्वच सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांचा डाटा व्यवसायिकांना देऊन पैसे कमवतात.