शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीतील काही भागात इंटरनेट सुविधा बंद

Update: 2021-01-26 10:47 GMT

आज दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करता दिल्लीतील काही भागातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक झाले आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.

मात्र, या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. काही लोक दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या दिशेने देखील गेले आहेत. या झटापटीत काही शेतकरी आणि पोलिसही जखमी झाले आहेत. तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Tags:    

Similar News