लहान बचत योजनांवरील व्याजकपातीचा निर्णय मागे, चुकून आदेश निघाल्याची कबुली

एका आर्थिक निर्णयाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मोदी सरकारने हा निर्णय चुकून घेतला गेल्याचे सांगत मागे घेतला आहे.

Update: 2021-04-01 03:40 GMT

केंद्र सरकारने लहान बचत योजनांबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असताना आता केंद्र सरकारने हा निर्णयच मागे घेतला आहे. लघु बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्रालया घेतला होता. पण आता निर्णय चुकून निघाल्याचे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय मागे घेण्याची घोषणा आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना धक्का देत केंद्रीय अर्थमंत्रालयाने बचत योजनांमध्ये व्याजकपातीचा निर्णय जाहीर केला होता. पण आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचे ट्विट केले आहे. तसेच लहान बचत योजनांवरील व्याजदर जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



 


1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे 30 जूनपर्यंत लहान बचत योजनांवर नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. यामध्ये PPF चे व्याजदर, पोस्टाच्या बचत खात्यांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. तसेच एक वर्षांच्या मुदतठेवी ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर, किसान विकासपत्र सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचे व्यादर कमी करण्यात आले होते. पण अखेर याचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसताच केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत निर्णय स्थगित केला आहे.

Tags:    

Similar News