Interest rate cuts row: 'चुकीला माफी नाही', पंतप्रधान नरेंद्र मोदींसह निर्मला सितारमण ट्रोल

Update: 2021-04-01 09:18 GMT

अल्पबचत योजनांवरील व्याज दरात कपात करण्याचा आदेश काढणाऱ्या केंद्रसरकारला विरोधकांबरोबरच नेटीझन्सनी सोशल मीडियावर चांगलंच फैलावर घेतलं आहे. दरम्यान केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला असून नजरचुकीनं हा आदेश काढला असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात निर्मला सितारमण यांनी आज सकाळीच ट्विट केलं. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.






काय होता निर्णय?


सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के केले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के केले आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी केले आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) हे नवे व्याजदर लागू राहतील. 

असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हे सर्व नजरचुकीने झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

यावर कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 'निर्मला सीतारामन यांचा निर्णय ही 'नजरचूक' होती की तो आदेश मागे घेण्याचा निर्णय ही निवडणुकांमुळं झालेली पश्चातबुद्धी होती? खरं काय?,'असा थेट सवाल केला आहे.




तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'नोटाबंदी असो की करोनाची लस मोफत पुरविण्याच्या आश्वासन असो, भाजपचे सरकार प्रत्येक वेळी देशातील जनतेची थट्ट करत आलं आहे. निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांनी तर हा अनुभव हमखास घेतला आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली. कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारनं थट्टा केली. यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीनं घेतले गेले असावेत,'

असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.


सोशल मीडियावर निर्मला सितारमण #NirmalaSitharaman सकाळपासूनच ट्रेंडींगमध्ये आहेत. त्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. 


The backpacker या अंकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये बंगाल निवडणुकांमुळं हा निर्णय परत घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.



The DeshBhakt या twitter verified अकाउंटवरुन निर्मला सितारमण यांच्या निर्णयचे तुलना सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजाशी केली आहे. यामध्ये सुएझ कालव्यात अडकलेलं जहाज आणि बाहेर पडलेलं जहाज असे दोन फोटो ट्वीट केले आहेत.



BAJPAI,PANKAJ,IN या अकांउटवरून मोदींचे व्यंगचित्र ट्विट करत आज फेकू दिवस असल्याचं म्हटलं आहे.

https://twitter.com/search?q=#NirmalaSitharaman&src=trend_click&vertical=trends

Tags:    

Similar News