सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडणं बुद्धीजीवीचं काम: न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात सरकारच्या खोट्या गोष्टी उघड करणे. हे देशातील बुद्धिजीवी लोकांचं कर्तव्य आहे. तसंच सरकारच्या खोट्या बातम्या, त्या खोट्या बातम्यावर अंकुश लावणे आणि सरकारच्या खोट्या नेरेटीव्हला थांबवणं हे देखील बुद्धीजीवी लोकांचं काम असल्याचं मत न्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड हे 6 व्या एम.सी. छागला स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय बाबींवर सरकारवर जास्त अवलंबून राहणे देखील चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगताना, प्रसारमाध्यमं निष्पक्ष आणि सर्व प्रकारच्या पूर्वग्रह आणि पूर्वग्रहांपासून मुक्त असावीत असं मत व्यक्त केलं आहे..
"कोणी सत्यासाठी राज्यावर अवलंबून राहू शकत नाही. सत्तेवर टिकण्यासाठी निरंकुश सरकारं लबाडीचा वापर करतात. आम्ही पाहिलं आहे की सर्व सरकारांनी कोविड 19 च्या माहितीशी छेडछाड केली आहे.
फेक न्यूज बद्दल चिंता...
न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकारांनी सरकारवर सरकारने कोरोनाच्या डाटा लपवल्याचा आरोप केला आहे. देशातील तज्ज्ञ लोकांनी सरकारने खरी माहिती लपवून खोटी आकडेवारी सादर केल्याचा आरोप सरकारवर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असंही म्हटलं आहे की, बनावट बातम्या वाढत आहेत, जागतिक आरोग्य संघटनेने त्याला 'इन्फोडेमिक' म्हटले आहे.
दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्येच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भात खोटी माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे.
या सोबतच, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसने अधिक जबाबदार असले पाहिजेत आणि त्यांनी बनावट बातम्या आणि चुकीची माहिती वेळोवेळी काढून टाकली पाहिजे असंही ते म्हणाले