राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता कमी?

Update: 2021-03-30 02:42 GMT

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. पण पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यास राज्यभरातून विरोध होत आहे. तसेच सोमवारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊन उद्योग जगतासाठी परवडणारे नाही, अशी भूमिका मांडली होती. भाजपनेसुद्धा कडक लॉकडाऊन लावण्यास विरोध केला आहे. तर जनसामान्यांकडून लॉकडाऊन नकोच अशी भूमिका मांडण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार लॉकडाऊनऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

यानुसार सरसकट लॉकडाऊन लावण्यापेक्षा निर्बंध कठोर केले जाऊ शकतात. यामध्ये लोकांच्या फिरण्यावर निर्बंध घातले जातील. लोकल किंवा बससेवा सुरू राहू शकतात. पण पब, हॉटेल्स, मॉल, थिएटर यांच्यावर आणखी कडक निर्बंध लावले जाऊ शकतील. त्याचबरोबर सर्व खासगी ऑफिसेसमध्येही 50 टक्केच कर्मचाऱ्यांची सक्ती करुन त्याचे पालन होते आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मजुरांना सगळ्यात जास्त फटका बसला होता. त्यामुळे हजारो मजून पायी आपापल्या गावाकडे निघाले होते. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर सरकार 1 एप्रिलपासून कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काय म्हटले होते आनंद महिंद्रा?

दुसऱ्या कोरोना लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असताना कोणत्याही क्षणी लॉकडाऊची घोषीत होण्याची शक्यता असताना उद्योग जगताकडून टाळेबंदीचा जालिम इलाज नको, वेगळ्या मार्गानं कोरोना नियंत्रणात आणा अशी मागणी पुढे येत आहे. समाजमाध्यमांवर सक्रीय असलेले महींद्राचे मालक आनंद महींद्रा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरें आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना टॅग करत त्यांच्या जुन्या मागणीनुसार महाराष्ट्रातील सर्वांचे प्राधान्यानं लसीकरण करुन घ्यावे अशी मागणी केली आहे.

सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळं काहीसं चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. राज्यातील लॉकडाऊनमुळं एका आव्हानाच्या परिस्थितीला तोंड दिल्यानंतर आता कुठे जनता सावरत होती, तोच पुन्हा ही टाळेबंदीची टांगती तलवार सर्वांच्याच गळ्याशी आली. याच बाबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

लॉकडाऊनला मध्यमवर्गीय घटकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो, यामागचं कारणंही त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं. 'उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया', असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे

Tags:    

Similar News