INS Vikrant Launching : INS विक्रांतवरून रंगला श्रेयवाद, काँग्रेसने शेअर केला नऊ वर्षे जुना व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोची येथे INS विक्रांत ही युध्दनौका नौदलात दाखल झाली. त्यावरून नवा श्रेयवाद रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथे नौदलाच्या लोगोचे अनावरण केले. त्यानंतर मोदी INS विक्रांत ही युध्दनौका मोदी यांच्या हस्ते नौदलात दाखल झाली. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून हे श्रेय काँग्रेसचे असल्याचे म्हटले आहे.
INS विक्रांत ही विमानवाहू युध्दनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे. त्यापार्श्वभुमीवर राजकारण सुरू झाले आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात 2013 साली तात्कालिन संरक्षण मंत्री ए के एन्टोनी यांनी INS विक्रांतचे उद्घाटन करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला. तर पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत. ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते INS विक्रांत या युध्दनौका देशाला समर्पित करीत आहेत. यापेक्षा जास्त मोदी सरकारचे काहीही श्रेय नाही. मोदी पंतप्रधान आहेत. म्हणून ते ही युध्दनौका देशाला समर्पित करीत आहे. मात्र 12 ऑगस्ट 2013 रोजी तात्कालिन संरक्षणमंत्री ए के एन्टोनी यांनी या युध्दनौकेचे उद्घाटन केले होते. तसेच ही युध्दनौका पुर्ण होण्यासाठी 22 वर्षे लागले आहेत. मात्र मोदी याचे श्रेय घेत असल्याची टीका जयराम रमेश यांनी केली.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, INS विक्रांत ही युध्दनौका नौदलात सामील होणे ही 1999 पासूनच्या आतापर्यंतच्या सर्व सरकारांचे योगदान आहे. पण नरेंद्र मोदी ते मान्य करतील का? असा सवाल यावेळी जयराम रमेश यांनी केला.