UP Election : कन्हैया कुमारवर शाई फेक
उत्तर प्रदेश निवडणूकीची धाम धूम सुरू आहे. तर सर्वच पक्ष आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. मात्र मंगळवारी लखनऊमध्ये काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार याच्यावर शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आला.;
उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरु आहे. तर सर्वच पक्ष एकमेकांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. त्यातच लखनऊमध्ये कन्हैय्या कुमारवर हल्ला झाल्याचे समोर आले. त्यात कन्हैय्या कुमारवर शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.
काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार लखनऊमधील सेंट्रल मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार सदफ जफर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची घटना घडली. तर ही घटना काँग्रेस कार्यालयात घडल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र कन्हैय्या कुमार यांच्यावर फेकलेली शाई नसून अॅसिड असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
लखनऊ सेंट्रल मतदारसंघातुन कॉंग्रेसने अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या सदफ जफर यांना उमेदवारी दिली आहे. तर सदफ जफर या व्यवसायाने शिक्षिका व अभिनेत्री आहे. सदफ जफर ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या निदर्शनादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला लखनऊ येथुन अटक करण्यात आली होती. मात्र दंगलप्रकरणी अटक केलेल्या सदफ सध्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत.
सध्या उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरु आहे.राज्यात सात टप्प्यात मतदान होणार असुन १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.जास्तीत जास्त जागा जिंकुन सरकार स्थापन करण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार याच्यावर शाई फेकण्यात आल्याने निवडणूकीला गालबोट लागले आहे.