मंदीच्या तोंडावर भारतीयांना संधी, 2023 मध्ये पगारात होणार मोठी वाढ

यंदा देशात मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापार्श्वभुमीवर 2023 मध्ये देशातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळणार आहे.

Update: 2023-01-17 09:32 GMT

सध्या अनेक अर्थतज्ज्ञांकडून जागतिक मंदी (economic slowdown) येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे 2023 या वर्षात भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार असल्याचे कॉर्न फेरी या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

कॉर्न फेरी या संस्थेने आशिया-पॅसिफिक (asia pacific region) देशातील कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारवाढीबाबत सर्व्हे (survey pegs average raise at 9.8 %) केला. या सर्व्हेनुसार 2023 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.8 टक्के इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही वाढ गेल्या वर्षी 9.4 टक्के इतकी होती. मात्र यंदाची वाढ आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठी असणार आहे.


आशिया पॅसिफिक प्रदेशात पगारवाढीच्या बाबतीत भारतापाठोपाठ व्हिएतनाम 7 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर असणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील कर्मचाऱ्यांना सर्वात कमी म्हणजे अवघी 3 टक्के इतकीच पगार वाढ होणार आहे.




 



सध्या मंदीचे सावट असले तरी कौशल्याचा अभाव असल्याने उच्च व तंत्रज्ञान कंपन्या 10.4 टक्के इतकी मोठी पगारवाढ देणार आहेत. त्यानंतर लाईफ सायन्स आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात 10.2 टक्के, औद्योगिक वस्तूंमध्ये 9.9 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये 9.8 टक्के, सेवा क्षेत्रात 9.8, रासायन उत्पादन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.6 टक्के, बांधकाम व्यवसायातील कर्मचाऱ्यांना 9.1 टक्के, किरकोळ व्यवसायातील क्षेत्रात 9 टक्के, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात 9 तर उत्पादन क्षेत्रात 8 टक्के इतकी पगारवाढ मिळणार असल्याचे कॉर्न फेरी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत सिंग यांनी एका नामांकित दैनिकाशी बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News