I &B Twitter Hacking : पंतप्रधान मोदींच्या Twitter अकाऊंटनंतर I&B चे अकाऊंट हॅक, सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांपुर्वी देशाच्या पंतप्रधानांचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. तर बुधवारी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती ट्वीटरने दिली आहे.

Update: 2022-01-12 06:01 GMT

जगभरात अनेक महत्वाच्या व्यक्तींचे ट्वीटर अकाऊंट हॅक केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच 3 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले होते. त्यावेळी हॅकरने कोविड 19 रिलिफ फंड (Covid19 Relief Fund) साठी बीटकॉईनमध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते. मात्र काही वेळातच हॅकरने ट्वीट डिलीट केले. त्यानंतर 12 डिसेंबर रोजीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीटर अकाऊंट हॅक करत बीटकॉईनबाबत मोठी घोषणा केली होती. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्यातच आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती ट्वीटरने दिली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Information and Broadcasting ministry twitter account hacked)

बुधवारी सकाळी हॅकरने माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले होते. हॅकरने खात्याचे नाव एलॉन मस्क असे ठेवले होते. त्यावरून ग्रेट जॉब अशा आशयाचे ट्वीट केले होते. तर त्यावरून मोठा कार्यक्रम होणार आहे, असंही ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फसव्या लिंक या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. मात्र तात्काळ मंत्रालयाच्या ट्वीटर अकाऊंटवर नियंत्रण मिळवण्यात तंत्रज्ञांना यश आले आणि हॅकरने केलेले ट्वीट हटवण्यात आले.

ट्वीटरने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिल्यानंतर तात्काळ अकाऊंट रिस्टोर केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ट्वीट करून अकाऊंटच्या फॉलोवर्सना दिली.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्वीटर अकाऊंटचे 14 लाख 3 हजार 804 फॉलोवर्स आहेत. तर देशासाठी महत्वाचे असेलेल ट्वीटर अकाऊंट आहे. सायबर सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:    

Similar News