पाकिस्तानची वाट लागली, दूध २१० रूपये लिटर
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईनं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत इथल्या लाखों घरांचं नुकसान झालं होतं. त्यामुळं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडत गेला आणि पाकिस्तानवर आर्थिक आरिष्ट ओढवलंय.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monterey Fund) कडून कर्ज घेऊ इच्छित आहे. मात्र, हे कर्ज मिळवण्यापूर्वीच पाकिस्तानातील ग्राहकांना दूध आणि चिकन सोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाढत्या दरांचा सामना करावा लागतोय. महागाई इतकी वाढलीय की सामान्य नागरिकांना दोन वेळचं जेवणंही मुश्किल झालंय. पाकिस्तानचं आघाडीचं दैनिक डॉन (The Dawn) ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात दुधाचे दर १९० रूपये प्रतिलिटर वरून २१० रूपये इतकं झालंय. मागील दोन दिवसात ब्रॉयलर चिकन (Broiler Chicken) चिकनच्या दरात प्रतिकिलो ३०-४० रूपयांची वाढ झालीय. त्यामुळं आता ब्रॉयलर चिकन प्रतिकिलो ४८० -५०० रूपये प्रतिकिलो झालं आहे. चिकन चे दर आता ७००-८०० रूपये आहेत.
दुध आणखी महागणार
कराची मिल्क रिटेलर्स असोशिएशन चे प्रवक्ते वहीद गद्दी सांगतात की, “१ हजार पेक्षा अधिक दुकानदार दुध वाढीव दराने विकत आहेत. प्रत्यक्षात वाढीव दराने दुध विक्री करणारे हे या असोशिएशनचे सदस्यही नाहीत. डेअरी किंवा रिटेल दुकानदारांनी घोषित केलेली दरवाढ मागे न घेतल्यास दुधाचे दर २१० रूपये प्रतिलिटर ऐवजी २२० रूपये लिटर होतील.”पाकिस्तान सध्या रेकॉर्डब्रेक महागाईतून बाहेर येण्यासाटी संघर्ष करतोय. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटक बसला होता. या दुर्घटनेत १ हजार ७३९ लोकांचा मृत्यू झाला होता. जवळपास २० लाख घरं नष्ट झाली होती.