महागाईचा भडका, मे महिन्यात महागाई दराचा 6 महिन्यातील उच्चांक

Update: 2021-06-15 03:38 GMT

देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहे. यामुळे नागरिकांनी नव्याने सुरूवात केली आहे. पण आता महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एप्रिलमध्ये 4.23 असलेला महगाईचा दर मे महिन्यात तब्बल 6.3 टक्के झाला आहे. गेल्या 6 महिन्यातील महागाईचा हा उच्चांक ठरला आहे. अन्नधान्य आणि इंधन दरवाढीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

मे महिन्यात खाद्य तेलाचे दर तब्बल 31 टक्क्यांनी वाढले आहेत. अन्नधान्याचा महागाई दर एप्रिल महिन्यात 1.96 टक्के होता, पण मे महिन्यात हाच दर 5.01 दर झाला आहे. वाढत्या महागाईमुळेच आरबीआयने व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही.

देशभरात सध्या पेट्रोलल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. यामुळे महागाई जास्त वाढली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पेचट्रोल 100 रुपयांच्या वर गेले आहे. गेल्या 6 आठवड्यात तब्बल 24 वेळा दरवाढ झाली आहे. या सगळ्याचा परिणाम महागाई वाढण्यात झाला आहे. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी इंधन दरवाढीमुळे नागरिकांना त्रास होत असला तरी जनकल्याण योजनांसाठी सरकार बचत करत असल्याचे याआधीच म्हटले आहे.

Tags:    

Similar News