ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड, गॅस सिलिंडर महागले
गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर याबाबतचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर याबाबतचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक बेहाल झाले आहेत. त्यातच आजपासून एलपीजी गॅसच्या किंमती 250 रुपयांनी वाढणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे.
वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मात्र ही वाढ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे. त्यामुळे तुर्तास घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
22 मार्च रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली होती. मात्र त्यानंतर घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. गेल्या अकरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आज नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच व्यवसायिक गॅसच्या ग्राहकांना गॅस दरवाढीचा धक्का बसला आहे.
आज गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यवसायिक ग्राहकांना गॅस भरण्यासाठी मुंबईत 1 हजार 955 रुपयांऐवजी 2 हजार 205 रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी व्यवसायिक गॅसच्या किंमतीमधील चढउतार
ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत व्यवसायिक गॅसच्या किंमतीमध्ये 170 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 ला गॅसच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे.