उद्योजकांची पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही...

Update: 2023-01-19 08:13 GMT

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दावोसमधून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणण्याचे काम करुन दाखवले आहे. आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांनी मारलेल्या गप्पा सारख्या गप्पा न मारता, राज्यात गुंतवणूक आणून दाखवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. याचे खरे श्रेय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाते.

राज्यात गेल्या पाच महिन्यापूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात जगभरातून गुंतवणूक आणण्यासाठी सुरवात केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने गेल्यावर्षी पेक्षा चारपट अधिक सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे दिली आहे. आणि दावोसमध्ये झालेले करार हे प्रत्यक्षात सुद्धा येतील असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कन्झर्व्हेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्वांना अनुसरुन पर्यावरणपूरक विकास करणे, यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील एका चर्चासत्रात सांगितले. बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावर दावोस येथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्य सरकार कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पवन आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन, वन आच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर भर देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याचा श्वाश्वत विकास करण्यासाठी सार्वजनिक व खासगी भागीदारी गरजेची असल्याचे शिंदे यांनी सांगत यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सुद्धा शिंदे यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News