नरेंद्र मोदी प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणली आणीबाणी - केतकर
Indira Gandhi brought emergency to keep people with Narendra Modi tendency away - Ketkar;
आणीबाणी आणली नसती तर नरेंद्र मोदी प्रवृत्तीच्या लोकांनी सत्ता ताब्यात घेतली असती. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणून लोकशाही वाचवली असं मत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी स्मारक समिती, पुणे मार्फत आयोजित ऑनलाईन चर्चा सत्रात ते बोलत होते. 'इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारताची वाटचाल' या विषयावर बोलताना कुमार केतकर यांनी ही टीका केली.
इंदिरा-राजीव हत्या.. धोका अजून टळलेला नाही
इंदिरा गांधी आणि पाठोपाठ राजीव गांधी यांची हत्या हा जसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता तसाच तो इथल्या अंतर्गत शक्तींचा ही भाग होता. या दोघांचीही हत्या करणाऱ्या शक्तींचंच देशावर सध्या प्राबल्य असून धोका अजून टळलेला नाही असं मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.