Equality Day: ब्रिटिश कोलंबिया प्रांतात साजरी केली जाणार आंबेडकर जयंती…

Equality Day: ब्रिटिश कोलंबिया प्रांतात साजरी केली जाणार आंबेडकर जयंती… Indians hail British Columbia's gesture to mark Ambedkar's birthday as Equality Day;

Update: 2021-04-12 05:47 GMT

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला १३० वी जयंती. मानवतेला समानतेची शिकवण देणाऱ्या आणि वर्षानुवर्षाची अस्पृश्यांना दिल्या जाणाऱ्या असमानतेच्या वागणूकीची बेडी तोडणाऱ्या महामानवाची जयंती जगभरात साजरी केली जाते. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ब्रिटिश कोलंबिया येथे "डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस" म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटिश कोलंबिया शासनाने घोषणापत्र जाहीर केलं आहे…

 या घोषणापत्रात…




 


ज्याअर्थी ब्रिटीश कोलंबिया सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रांत आहे. ज्यात बरेच लोक आणि समुदाय यांचा समावेश आहे आणि

ज्याअर्थी ब्रिटिश कोलंबियामधील आदिवासी, काळे आणि वर्णाचे लोक प्रणालीगत वर्णद्वेष, अन्याय, भेदभाव आणि द्वेष सतत अनुभवत आहेत आणि ब्रिटीश कोलंबिया सरकार सर्व प्रकारच्या वर्णद्वेषाला संबोधित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ज्याअर्थी भारतात १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते.

"भारतीय राज्यघटनेचे जनक" म्हणून ओळखले जाणारे सुधारक, ज्यांनी दलित समाजांच्या हक्कांसाठी वकिली केली आणि जातीवर आधारित भेदभावाविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले, आणि ज्याअर्थी डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस म्हणजे त्यांचे समानता आणि सामाजिक न्यायाविषयीचे समर्पण लक्षात ठेवण्याची आणि त्याचा सन्मान करण्याची संधी ब्रिटिश कोलंबिया आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे; आता आपण या सनदेद्वारे जाहीर घोषणा करतो की १४ एप्रिल २०२१ हा दिवस "डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस "

म्हणून ब्रिटिश कोलंबिया प्रांतात ओळखला जाईल.


अशी घोषणा ब्रिटिश कोलंबिया प्रांतांतील सरकारने केली आहे.

Tags:    

Similar News