भारतीय सैन्याने शेजारील राष्ट्रांच्या सैन्यासोबत साजरी केली दिवाळी

Update: 2021-11-04 15:50 GMT

देशात दिवाळी साजरी होत असताना, देशाच्या विविध भागांतील लोक आपापल्या पद्धतीने सण साजरा करत आहेत. तर कारगिल, लडाख आणि सियाचीनमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात, तर बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्सच्या जवानांनी गुजरात, राजस्थान, पंजाब, त्रिपुरा यासह इतर आंतरराष्ट्रीय सीमेवर शेजारी राष्ट्रांच्या सैनिकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात लष्करी जवानांची भेट घेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र, भारतीय सैनिकांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

"आपले सैनिक हे भारतमातेचे 'सुरक्षा कवच' आहेत. सैनिकांमुळेच देशातील लोक शांतपणे झोपू शकतात आणि सणांचा आनंद घेऊ शकतात," सीमावर्ती जिल्ह्यात सैनिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली. "मला दिवाळी कुटुंबियांसोबत घालवायची होती, म्हणून मी तुमच्या सोबत उत्सवात सामील झालो," असं पंतप्रधान म्हणाले.

Tags:    

Similar News