विमानात लघुशंकेचं पुन्हा एक प्रकरण: न्यूयॉर्क दिल्ली प्रवासात घडली घटना
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्या बद्दल ही घटना घडली आहे. या तरुणाला दिल्लीतील इंदिरा गांधी (Indira Gandhi) आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे.;
ही घटना AA292 या अमेरिकन एअरलाईन्सच्या (American Airlines) फ्लाईटमध्ये घडली आहे. या फ्लाईटने शुक्रवारी सव्वा नऊ वाजता न्यूयॉर्कवरुन (New York) उड्डाण घेतलं. १४ तासांच्या प्रवासानंतर शनिवारी ४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता हे विमान दिल्लीतल्या आयजीआय एअरपोर्टवर (ITI Airport) उतरलं. अमेरिकन एअरलाइन्सच्या AA292 फ्लाइटमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी साडेनऊ वाजता न्यूयॉर्कहून विमानाने उड्डाण केले. 14 तासांच्या प्रवासानंतर शनिवारी, 4 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता विमान दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरले. या घटनेतील आरोपी अमेरिकेतील विद्यापीठात शिकत आहे.
दारूच्या नशेत सहप्रवाशाचा लघुशंका केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सहप्रवाशाने याबाबत तक्रार केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने माफी मागितली आहे. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशाने सदर विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही. कारण त्याच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला. विद्यार्थ्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातही अशीच घटना घडली होती. न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा (Shankar Mishra) नावाच्या मद्यधुंद व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याची घटना देखील समोर आले होते. या घटनेच्या महिनाभरानंतर मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अशीच एक घटना अमेरिकन एअरलाईन्समध्ये घडली आहे यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विमानतळच्या "बोर्डवरील घटनेमुळे, आम्ही या प्रवाशाचा परतीचा प्रवास आणि आमच्या फ्लाइटमधील भविष्यातील कोणत्याही प्रवास रद्द करणार आहोत अमेरिकन एअरलाइन्सने सांगितले.