भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…

भारताचे एक मिसाइल परिक्षणादरम्यान पाकिस्तान मध्ये कोसळल्याने पाकिस्तान ने भारताकडे गुरूवारी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावर आज भारत सरकारच्या डिफेंस विंग ने स्पष्टीकरण दिलं आहे.

Update: 2022-03-11 15:59 GMT

भारताचे एक मिसाइल परिक्षणादरम्यान पाकिस्तान मध्ये कोसळल्याने पाकिस्तान ने भारताकडे गुरूवारी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावर आज भारत सरकारच्या डिफेंस विंग ने स्पष्टीकरण दिलं आहे.

रुटीन मेंटीनेंस सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे मिसाइल फायर झाली. भारत सरकारने हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतलं असून यासाठी हाय लेव्हल कोर्ट ऑफ इनक्वायरी बसवण्यात येईल असं सांगितलं आहे.

डिफेंन्स विंग ने आपल्या निवेदनात ही मिसाइल पाकिस्तान च्या क्षेत्रात कोसळल्याचं मान्य केलं आहे. तसं याबाबत खेद व्यक्त करत या घटनेत कोणतीही जीवित हानी न झाल्याचं म्हटलं आहे.



 पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी या संदर्भात दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.43 वाजता एक हायस्पीड वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून आली आणि पाकिस्तानच्या हद्दीत कोसळली. यामुळे पाकिस्तानच्या नागरी भागांचे काही नुकसान झाले आहे. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.

मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितल्यानुसार मिसाइल बुधवारी रात्री पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील खानेवाल जिल्हामधील मियां चन्नू भागात कोसळली.

या नंतर पाकिस्तान वायु सेना अलर्ट मोड आली होती. हे मिसाइल साधारण २० हजार फूट उंचीवर होते. हे मिसाइल पाकिस्तान ने पाडले नाही तर हे मिसाइल आपले आप कोसळले.

मिसाइल च्या या अपघाताने पाकिस्तान आणि भारतीय जनतेला देखील धोका होता. सुदैवाने हे मिसाइल मानवी वस्तीवर कोसळले नाही.


Tags:    

Similar News