दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 113 धावांनी दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1- 0 ने आघाडी घेतली आहे.;

Update: 2021-12-30 14:05 GMT

मुंबई// दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1- 0 ने आघाडी घेतली आहे. या विजयासोबतच टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एकूण पॉईंट्स 54 आणि परसेंटेज पॉईंट्स 64.28 टक्के झालेत. मात्र तरीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ पाकिस्ताननंतर चौथ्या क्रमांकावर आहे, कारण भारताचे परसेंटेज पॉईंट्स पाकिस्तानपेक्षा कमी आहेत.

ऍशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा इनिंगच्या फरकाने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला 2019 ऍशेस सीरिजपासून सुरुवात झाली होती. जून 2021 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली होती. यानंतर दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या टेस्ट सीरिजपासून सुरुवात झाली. या सीरिजमध्ये भारताने 2-1 ने आघाडी घेतली.

Tags:    

Similar News