India Vs Pakistan : मोदी स्टेडीयम वर भारत पाक सामना, मनसेचा भाजपा-सेने वर वार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मोदी स्टेडियमवर होणार असल्याने मनसेने भाजप आणि शिवसेनेवर टीकास्र सोडले आहे.;

Update: 2023-06-29 05:07 GMT

ICC World Cup 2023 : ICC ने विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना अहमदाबाद येथील नरेद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यावरून मनसेने थेट भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

ICC विश्वचषक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यापुर्वीच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्र सोडले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे माननीय बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावा, हे तर पटूच शकत नाही. यावर भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उबाठा यांना विचारत नाही, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी भाजप आणि शिंदे गटाला सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले.


हे ही पहा...

जाती तोडा,माणूस जोडा | मॅक्समहाराष्ट्र

Full View


Tags:    

Similar News