India Population : 14 वर्षात भारतात अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त बालकांचा जन्म
Population : भारतातील लोकसंख्या वाढीच्या वेगामुळे 14 वर्षात एकट्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त बालकांचा भारतात जन्म झाला आहे.;
America population : अमेरिकेकडे सध्या महासत्ता म्हणून पाहिले जाते. मात्र भारताने लोकसंख्येच्या बाबतीत महासत्ता असल्याचे सिध्द केले आहे. त्यातच गेल्या 14 वर्षात भारतात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त बालकांचा जन्म झाला आहे.
India Population increase : भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) आहे. त्यामुळे आर्थिक महासत्ता बनण्यासाठी भारताचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा दावा मोदी सरकारकडून (PM Narendra Modi Government) करण्यात येतो. मात्र सध्या अर्थव्यवस्थेच्या नाही तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकून नंबर वन होण्याचा मान मिळवला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोष (UNFPA) च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या (China Population) 142 कोटी 57 लाख इतकी आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत भारत नंबर वन बनला आहे. चीन दुसऱ्या तर अमेरिका 34 कोटी लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वयानुसार देशातील लोकसंख्येचे प्रमाण? (Age wise Population in India)
देशात 7 टक्के लोकसंख्या ही 65 वर्षाहून अधिक आहे. तर 68 टक्के लोक 15 ते 64 या वयोगटातील आहेत. 26 टकके लोक 10 ते 24 या वयोगटातील आहेत. 18 टक्के लोक 10 ते 19 वयोगटातील आहेत. देशातील 25 टक्के लोकसंख्या 14 वर्षापर्यंत आहे. तर 50 टक्के लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
सरासरी आयुष्यमान (Average Age in India )
देशात पुरुषांचे सरासरी आयुष्यमान हे 71 वर्षे तर स्त्रियांचे सरासरी आयुष्यमान 74 वर्षे आहे. त्याबरोबरच देशात 15 ते 49 वयोगटातील 51 टक्के महिलांकडून गर्भनिरोधकांचा वापर केला जातो. त्याबरोबरच 2009 ते 2023 या कालावधीत देशात सध्याच्या एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के बालकांचा जन्म झाला. तर 2050 पर्यंत देशात पाचपैकी एक ज्येष्ठ नागरिक असेल. यामध्ये 2030 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या 19 कोटी 20 लाख इतकी होईल.
लोकसंख्येनुसार देशांचे क्रम (Ranking of Population country wise)
- India Population : भारत 142.86 कोटी लोकसंख्येसह प्रथम क्रमांकावर
- China Population : चीन 142.57 कोटी लोकसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर
- America Population : अमेरिका 34 कोटी लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर
- Indonesia Population : इंडोनेशिया 27.75 कोटी लोकसंख्येसह चौथ्या क्रमांकावर
- Pakistan Population : पाकिस्तान 24.05 कोटी लोकसंख्येसह पाचव्या क्रमांकावर
देशातील तरुण आणि वृध्दांची संख्या जास्त असलेली राज्ये
पंजाब आणि केरळमध्ये सर्वाधिक वयस्कर लोकांची संख्या आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात सध्या सर्वाधिक तरुणांची संख्या आहे.