नवा कोरोना : इंग्लंडमधून येणाऱ्या विमानांवर भारतात बंदी

इंग्लंडमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूनमुळे पुन्हा एकदा नवीन संकट आले आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर जाणवू लागला आहे.

Update: 2020-12-21 10:33 GMT

इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर तिथल्या विविध भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळेच या विषाणूचा प्रसार भारतात होऊ नये यासाठी केंद्र सरकारने आता इंग्लंडमधून येणाऱ्या विमानांना भारतात ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबरला रात्री १२ वाजेपासून ते ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण इंग्लंडच्या अनेक भागातील लोकांना झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तिकडे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान हा या विषाणूची संसर्ग क्षमता कोरोनाच्या आधीच्या विषाणूपेक्षा जास्त असली तरी त्याचा धोका मात्र आधीच्या विषाणू एवढाच आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे पुरेपूर नियम पाळावे असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

नवीन कोरोना संकटामुळे शेअर मार्केट कोसळले दरम्यान इंग्लंडमधील नवीन कोरोनाच्या संकटामुळे शेअर मार्केटवर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वर जाणारा निर्देशांक सोमवारी १८०० अंकानी कोसळला आहे. तर निफ्टी १३३०० अंकांनी खाली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी घालण्यात आल्याने नवीन कोरोनाच्या संकटाची छाया शेअर मार्केटवर पडली आहे.

Tags:    

Similar News