संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे

देशाचं नेतृत्व पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात महाप्रलय घडून आला. भारतीय कोरोनाच्या स्ट्रेन ने जग घाबरले असताना भारतीय जगबंदी,इंजेक्शन, ऑक्सिजनसाठीच्या रांगा आणि स्मशानात चिता पेटवण्यासाठी वेटिंग अनुभवायला मिळत आहेत याची उद्विग्नता मांडली आहे, सीए आणि लेखक अभ्यासक प्रकाश झावरे पाटील यांनी...

Update: 2021-04-24 11:31 GMT

ज्यांनी 2002 चे कर्तृत्व पाहून 2014 ला एका मूर्ख माणसाच्या हाती देशाची सूत्र सोपवली होती त्यांनी पार्टी करायची वेळ आली आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. इंजेक्शन, ऑक्सिजनसाठीच्या रांगा आणि स्मशानात चिता पेटवण्यासाठी वेटिंग आणि त्यासाठी दिले जाणारे टोकन हतबल होऊन फुटपाथवर जाळली जाणारी प्रेते हे सर्व जगाला कळलं आहे. खोटं बोलू नका भक्तांनी सुद्धा त्यांच्या अमेरिकेत आणि इतर ठिकाणी असणाऱ्या कुटुंबियांना सध्या भारतात येण्याची घाई करू नका असं सांगितलं आहे.

एप्रिल 2020 मध्ये झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीचे मिनिट प्रसिद्ध झाले आहेत. भारतात ऑक्सिजनचा तुटवडा होऊन आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते हे तज्ञ लोकांनी तेव्हाच सांगितले होते तरी त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आणि महामहिम सांगतो तसे दिवे लावणे, थाळ्या वाजवणे हे उत्सवी उद्योग करण्यात आपण मश्गुल राहीलो. आणि ऑक्सिजन निर्यात करीत राहिलो.

भारतात वॅक्सिन उत्पादन होते. याला contract manufacturing म्हणतात. करारानुसार ज्यांनी कच्चा माल आणि फॉर्म्युला पुरवला आहे त्या देशांना आणि त्या परदेशी कंपन्यांना वॅक्सिन निर्यात करणे भाग होते. तसे सिरम इन्स्टिट्यूट करीत होती. नको तिथे श्रेय घेण्याच्या घाणेरड्या वृत्तीमुळे आपण सर्व जगाचे तारणहार आहोत अशा पोस्ट लिहिण्यात आल्या. बिनडोक इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि बकरी लेंड्या टाकत नाही इतक्या वेगाने पोस्ट टाकून भक्तांनी "वॅक्सिन डिप्लोमसी" या नावाखाली लोकांना अंधारात ठेवलं.

आपल्या देशाने आपल्याच देशातील वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांना वॅक्सिनची ऑर्डर कधी दिली याची माहिती घ्या. अमेरिका, इंग्लंड सोडा, मोरोक्कोसारख्या देशानेसुद्धा ऑर्डर सहा आठ महिने आधीच बुक केली होती. जेव्हा आपण थाळ्या वाजवणे आणि भारत कसा विश्वगुरू झाला आहे अशा पोस्टिंच्या लेंडक्या टाकण्यात व्यस्त होतो.

आता राज्य सरकारची काहीच जबाबदारी नाही का? असं म्हणत काही भक्त या पोस्टवर येतील. बाबांनो काही लिहिण्यापूर्वी कालच्या मुख्यमंत्री आणि तुमच्या देवाच्या मीटिंग चे व्हिडीओ पहा. केजरीवाल बोलत असताना काळाठिक्कर पडलेला पण मास्कच्या आत लपलेला तुमच्या देवाचा चेहरा पहा. त्याला नको तेव्हा प्रोटोकॉलची आठवण येत होती. केंद्र आणि राज्यसरकारला वैक्सीनची किंमत वेगवेगळी का याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?

सतत विद्वान आणि शिकलेल्या लोकांची लिबरडूं, खान मार्केट गॅंग अशी संभावना करीत एक सातवी नापास माणूस तुम्ही देशाच्या उरावर बसवला. त्याचा तडीपार सहकारी चाणक्य म्हणून मिरवला. खरं तर नोटबंदी केली, नको तसा जीएसटी आणला तेव्हाच यांच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. पण तुम्ही द्वेषाने आंधळे झाले होते. आता स्वतःच्या घरात इंजेक्शन, औषध इत्यादींसाठी तडफड करताना आणि जे गेलेत त्यांच्या फोटोला हार घालताना तरी तुमचे डोळे उघडतील का?

सोबत जगात जो डंका वाजतोय त्याचे पुरावे देतोय. जगातल्या कित्येक देशांनी त्यांच्या नागरिकांना भारतात फिरकू नका असा सल्ला दिला आहे. इतका मोठा डंका वाजतोय. तुमच्या गुंडांनी स्मशानाला पत्रे ठोकले तरी रॉयटरने ड्रोनने फोटो काढून जगभरात फिरवले आहेत. आणि हो तुम्हाला आणि तुमच्या आत्मनिर्भर व्हा सांगणाऱ्या नेत्यांना इंग्रजी वाचता येत असेल तर लेख पण वाचा.

Tags:    

Similar News