भारतीय 'पारदर्शकते'चा डंका आता जगभर पोचला..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताची परिस्थिती बिकट केली असताना भाजप समर्थक ट्रॉलर्स सिस्टीमला दोष देऊन 'पॉझिटिव्हिटी'चा आग्रह धरत आहे. यामध्ये आता कळस गाठत 'द ऑस्ट्रेलियन' या ऑस्ट्रेलियाच्या अग्रगण्य वर्तमानपत्रात कोरोना लाटेला जबाबदार मोदीविरोधी लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्ताने परदेशी वृत्तपत्राला नोटीस धाडली आहे.;

Update: 2021-04-28 09:30 GMT

भारतीय कोरोनाची परिस्थिती दाखवणारे ट्विटर अकाउंट बंदी पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राला नोटीस पाठवल्याने सोशल मीडियातून भाजप आणि भारतीय सरकारची परदेशात प्रतिमा मलीन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे.

भारतात दुसरा लाटेचा कोरोना संसर्ग वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

लॉकडाऊन शिथिल करून विधानसभा निवडणुकीचे प्रचार रॅली आणि कुंभमेळ्याचे आयोजन केल्याबद्दल जगभरातील अग्रगण्य वर्तमानपत्रांनी मोदींना दोष दिला होता.

'द ऑस्ट्रेलियन' वर्तमानपत्राने उर्मटपणा, अति राष्ट्रवाद, कुचकामी नोकरशाहीच्या मदतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे‌ संकट 'गर्दी-प्रेमी' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून ओढवून घेतल्याची टीका केली होती.

याच स्वरूपाचे लेख गेली आठवडाभर अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट, इंग्लंडच्या द गार्डियन आणि टाइम मॅगझीन मधून प्रसिद्ध झाले आहेत.

द ऑस्ट्रेलियन मधील प्रसिद्ध लेखानंतर ऑस्ट्रेलिया मधील भारतीय उच्चायुक्त मात्र संतापले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राला नोटीस पाठवून ह्या बदनामीकारक वृत्ता बद्दल माफी मागून सुधारित वृत्त देण्याची मागणी केली आहे.

ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी या पुढील काळात अशा बिनबुडाच्या बातम्या देण्यापासून स्वतःला प्रतिबंध घालावा तसेच अति घाईने भारतातील कोरोना प्रसाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक प्रचार आणि कुंभमेळा जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्याची घाई करू नये असेही सुनावण्यात आलं आहे.




 


यासंबंधीची लेखी पत्र भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त पी कार्थिगेयन यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे उच्च आयुक्तांच्या पत्रामध्ये गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मार्च २०२० पासून आतापर्यंत सरकारने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची जंत्री देखील वर्तमानपत्राला देण्यात आली आहे.

भारतीय उच्चायुक्त च्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला असून करुणा परिस्थितीत चे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्चायुक्ताने भारतीय प्रतिमा परदेशात बदनाम केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

याविषयी मॅक्स महाराष्ट्राने ऑस्ट्रेलियाचे अनिवासी भारतीय असलेले नागार्जुन वज्रालाज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भारतातील व्यक्तीस स्वातंत्र्य प्रमाणेच ऑस्ट्रेलियातील व्यक्ती स्वातंत्र्य आहे मुक्त असून इथे प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर अशा पद्धतीचे नोटीस यापूर्वी निघाल्याचे मला आठवत नाही. ऑस्ट्रेलियात असलेले सगळेच भारतीय सध्या भारतातील कोरोना परिस्थितीमुळे चिंतेत असून आपापल्या परीने भारताला मदत करत आहेत. भारत देशाच्या परराष्ट्रीय धोरण देखील या संकटाच्या काळात मदतीचे असले पाहिजे. विनाकारण नोटिसा पाठवून देशाची प्रतिमा मलिन करुन स्वतःचं हसं करून घेणे योग्य नाही, असे नागार्जून वज्राला म्हणाले.

कोरोनाची परिस्थिति देशभर बिकट झाली असून देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे.

Tags:    

Similar News