Lying Machine, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

Update: 2021-04-24 14:40 GMT

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख Lying Machine असा केला आहे. राहुल गांधी यांनी या अगोदर केलेल्या ट्वीटमध्ये जाहिरातबाजी आणि गरज नसलेले प्रॉजेक्टवर काम करण्याऐवजी केंद्र सरकारने लसीकरण, ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात हे संकट अधिक कठीण होणार आहे. या संकटाशी लढण्यासाठी देशाला तयार राहायला हवं. असा सूचना वजा इशारा केंद्र सरकारला दिला होता.

त्यानंतर राहुल यांनी आज देशात झालेल्या लसीकरणाची आकडेवारी ट्वीट करत मोदींचं नाव न घेता. त्यांना खोटं बोलणारं मशीन असं संबोधलं आहे.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्वीट..

देशाला लसींची गरज आहे. खोटं बोलणारं मशीन... असं ट्वीट राहुल यांनी केलं आहे.

या ट्वीटमध्ये जगातील कोणत्या देशात सर्वाधिक लसीकरण झालं आहे. आणि आपण कुठं आहोत? याची माहिती दिली असून राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विट नुसार देशात फक्त 1.4 टक्के लसीकरण झालं आहे. भारत लसीकरणामध्ये पुढे असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचं मत राहुल यांनी या ट्वीटमधून मांडलं आहे. लोकसंख्येचा विचार करता भारत जगामध्ये लसीकरणाच्या बाबतीत 9 व्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.

Tags:    

Similar News